Share this post:

पुणे : पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांना प्रतिष्ठेच्या ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भामला व पंचशील फाउंडेशनच्या वतीने आयोजित या सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

नगरसेवक, शहर सुधारणा समिती व स्थायी समिती अध्यक्ष ते सभागृह नेते अशा विविध पदांवर काम करताना बिडकर यांनी नेहमीच लोकसहभाग, नदी संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *