Share this post:

​पिंपरी-चिंचवड : शिक्षण क्षेत्रात गेली ३० वर्षे निष्ठेने सेवा देणारे सांगवीतील आदर्श मुख्याध्यापक शिवाजीराव माने आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तथा प्रभारी मुख्याध्यापिका सविता शिवाजी माने या दांपत्याला लायन्स इंटरनॅशनलच्या वतीने एकाच वेळी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

​चिंचवड येथील सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात शिक्षक दिनानिमित्त आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात डिस्टिक ३२३४ डी २ (रिझन ३) अंतर्गत एकूण ३५ गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

​मान्यवरांची उपस्थिती:

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम. जे. एफ. ला. श्रेयस दीक्षित, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, रिजन चेअर पर्सन एम. जे. एफ. ला. सलीम सिकलगार आणि झोन चेअर पर्सन ला. बालाजी जगताप यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

​पूर्वसन्मान व सामाजिक कार्य:

माने दांपत्य कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळा (सांगवी) आणि कै. मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा (क्र. ५९, कस्पटे वस्ती) येथे कार्यरत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे. तसेच, ते लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. या डबल मानामुळे सांगवी परिसरातून माने दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *