Share this post:

प्रभाग क्र.२१ वैभव नगर परिसरात भाजपकडून विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार

पिंपरी :- प्रभाग क्रमांक २१ (पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल, अशोक थिएटर) मधील भारतीय जनता पार्टी आरपीआय आठवले पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांचा पाठिंबा वाढत असून, उमेदवार देखील केवळ विकासाच्या मुद्द्यांवर नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपाचे उमेदवार उषाताई वाघेरे मोनिकाताई निकाळजे गणेश ढाकणे नरेश पंजाबी यांनी आज वैभव नगर परिसरातील संवाद साधला.

निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रभाग क्रमांक २१ मधील परिसरात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. पदयात्रा, घराघरात भेटी, नागरिक संवाद, सभा आणि बैठकींच्या माध्यमातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांची माहिती, भविष्यातील योजनांचा आराखडा आणि स्थानिक प्रश्नांवर दिले जाणारे ठोस उपाय नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. नागरिकांकडूनही या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भाजपच्या नेतृत्वावर वाढता विश्वास आणि समर्थन स्पष्टपणे दिसून येत आहे.

येणाऱ्या काळात वाहतूक सुगमता, जल व्यवस्थापन प्रकल्पांसह पायाभूत सुविधांपासून प्रभागातील रस्ते, वाहतूक, जलपुरवठा ते मोठ्या विकास आराखड्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. भाजप सरकारने प्रत्येक समाजघटकासाठी स्वतंत्र योजना, थेट लाभ आणि समान संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अनुसूचित जाती, ओबीसी, मराठा, आदिवासी, अल्पसंख्याक- कुठलाही समाज मागे राहिलेला नाही. असे विविध मुद्दे उमेदवारांनी प्रचारादरम्यान अधोरेखित केल्याने वैभव नगर परिसरात भाजपच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणे–पिंपरी चिंचवड विभागात विकासाला वेगवान दिशा मिळाली आहे. प्रभागात देखील या विकासाच्या कामांनी सकारात्मक बदल घडवून आणले असून, भाजपच्या नेतृत्वाने विकासाचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा मार्ग सुगम केला आहे.”

  • उषाताई वाघेरे
    उमेदवार भाजपा प्रभाग २१.
Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »