
पुणे: गेल्या तीन वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू असल्याने लोकनियुक्त नगरसेवक नाहीत. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत असून छोट्या-मोठ्या कामांसाठी पालिकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. मात्र, या कठीण काळातही प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या मदतीला माजी सभागृह नेते गणेश बिडकर धावून आले आहेत. त्यांनी सुरू केलेला ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

काय आहे ‘बिडकर पॅटर्न’?
नगरसेवक नसल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी बिडकर यांनी एक सक्षम यंत्रणा उभी केली आहे. नागरिकांनी फक्त एक फोन करायचा आणि त्यांची तक्रार नोंदवायची, त्यानंतर बिडकर यांची टीम थेट जागेवर जाऊन संबंधित विभागाच्या मदतीने ती समस्या मार्गी लावते. यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचत आहेत.

या समस्यांवर होतोय झटपट तोडगा:
या उपक्रमांतर्गत विविध विभागांशी संबंधित तक्रारींचे निवारण केले जात आहे:
- पाणीपुरवठा व मलनिःसारण: गळती किंवा तुंबलेल्या वाहिन्यांची त्वरित दुरुस्ती.
- पथ विभाग: रस्त्यांवरील खड्डे आणि पथदिव्यांच्या समस्या.
- बांधकाम व देखभाल: सार्वजनिक मालमत्तांची दुरुस्ती व परवाने विषयक मार्गदर्शन.
- आरोग्य व स्वच्छता: कचरा उचलणे आणि परिसरातील स्वच्छता.
नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
”महापालिकेत अधिकारी दाद देत नव्हते, पण बिडकर यांच्या टीमला फोन केल्यावर काम घरी बसून झाले,” अशा भावना प्रभाग २४ मधील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. शासकीय कार्यालयात हेलपाटे मारणे बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
“नगरसेवक हा प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा असतो. महापालिका बरखास्त असली तरी नागरिकांच्या समस्या थांबलेल्या नाहीत. त्यांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळावी, ही आमची जबाबदारी आहे. याच भावनेतून आम्ही ही यंत्रणा राबवत आहोत.”
— गणेश बिडकर (माजी सभागृह नेते, पुणे महानगरपालिका)
ठळक वैशिष्ट्ये:
- हेलपाटे बंद: पालिकेत वारंवार जाण्याची गरज उरली नाही.
- त्वरित दखल: तक्रार प्राप्त होताच ‘ऑन फिल्ड’ कार्यवाही.
- सक्षम टीम: गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे जाळे.
