Share this post:


पुणे :पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील जनता वसाहत सांस्कृतिक हॉलसमोर असलेल्या कॅनॉलमध्ये २१ वर्षीय तरुणी पाण्यात पडल्याची घटना घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी कोणताही विलंब न करता लाईफ रिंग, लाईफ जॅकेट आणि दोरीच्या सहाय्याने बचावकार्य राबवत तरुणीला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले.
अग्निशमन दलाच्या जलद आणि धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रसंगानंतर स्थानिक नागरिकांनी पुणे अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »