Share this post:

मुंबई :  सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्याने अखेर रिया चक्रवतीला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  सुनावली आहे.

रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी रियाच्या जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. प्रियाच्या चौकशीमध्ये सुशांतच्या ड्रग्स कनेक्शनचे अनेक धागेदोरे मिळाले आहे. तसेच अनेक  बड्या, बड्या नेत्यांची व अभिनेत्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता असल्याने नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने जामिनाला तीव्र विरोध केला.

बुधवारी सकाळी तुरूंगात रवानगी केली जाईल. रियाला जर जामीन मिळाला तर ड्रग्स प्रकरणास परिणाम होऊ शकतो. तसेच तिच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यांच्यावर तपास होणे गरजेचे आहे. यासाठी तिला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी ही बाजू एनसीबीने मांडली.

तरी रियाचे वकील सतीश माने शिंदे म्हणाले की, रियाने एनसीबी ला तपासात सहकार्य केले. ती स्वतःहून सर्व माहिती देते. तसेच ती स्वतः ड्रग्स घेत नव्हती. सुशांतच्या सांगण्यावरून ड्रग्स त्याला मिळवून देत होती. तसेच  चौकशीसाठी बोलावले तर कार्य करेल असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. परंतु कोर्टाने हा युक्तिवाद  मान्य केला नाही. सरतेशेवटी रियाला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »