पिंपरी : आकुर्डी ग्रामस्थांनी महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतली. संपूर्ण आकुर्डी ग्रामस्थ अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी असून त्यांना आकुर्डी परिसरातून चांगले मताधिक्य मिळेल अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली.
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांची आकुर्डी ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी पप्पू काळभोर, नितीन कदम, विजय काळभोर, देवेंद्र काळभोर, पंढरी थरकुडे, गणेश काळभोर, वरुण काळभोर, मंगेश कुटे, उत्तम काळभोर, संजय काळभोर, निलेश पांढरकर, सतीश काळभोर, जक्कल काळभोर, मनीष काळखोर, विजय पांढरकर, समीर साबळे, पवन जवळकर, ज्ञानेश्वर लामतुरे आदी उपस्थित होते.
आकुर्डी ग्रामस्थ कायम आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी राहिले आहेत. आकुर्डी ग्रामस्थांचे अण्णा बनसोडे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ग्रामस्थांच्या सुखदुःखात तसेच विविध विकास कामांच्या निमित्ताने आकुर्डी ग्रामस्थ आणि अण्णा बनसोडे यांचे आपुलकीचे नाते तयार झाले आहे. ग्रामस्थ कायम अण्णा बनसोडे यांच्यासोबत काम करतील अशी ग्वाही उपस्थित ग्रामस्थांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत आकुर्डी परिसरातून अण्णा बनसोडे यांना चांगले मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्व ग्रामस्थ प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.