अमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कोरोनाची लागण झाली होती. सहा दिवसांनी घरी उपचार घेतल्यानंतर अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला यामुळे त्यांना तातडीने नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
नवनीत राणा यांच्या घरातील बारा सदस्यांना करुणा ची लागण झाली होती. यांत त्यांचे पती आमदार रवी राणा, सासू-सासरे दोन्ही मुले असे कुटुंबातील 12 जण कोरोनाची लागण झाली होती. सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांहीअहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.