कोझीकोड : कोरोना पार्श्वभूमीवर वंदे मातरम अंतर्गत दुबईवरून केरळ मध्ये 191 नागरिक येणार होते. दुबईवरून आलेले हे विमान आज रात्री आठ वाजता केरळ येथील कोझिकोड येथे उतरणार होते .परंतु केरळ मध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने विमान लँड करताना वैमानिकाचा अंदाज फसला आणि विमान स्लिप होऊन 35 फूट दरीत कोसळले. एअर इंडियाच्या दुबई-कोझीकोड (IX-1344)) या विमानाला मोठा अपघात झाला. या विमानात ६ क्रू मेबर्स आणि २ दोन पायलटसह १९१ प्रवासी होते. हा अपघात इतका भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले .या अपघातात पायलेट विजय साठे, को पायलेट सह एकूण 17 जणांचा मृत्यू झाला .तर 123 जखमी आहेत. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले.
सध्या केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत कोझीकोडच्या टेबलटॉप रनवेवर दुबईहून आलेलं एअर इंडिया एक्स्प्रेसचं विमान उतरत होतं. पण पावसामुळे अंदाज न आल्याने ते धावपट्टीवरून घसरून दरीत कोसळलं. तरी विमानाचे वैमानिक साठे यांनी घाई न करता दुसऱ्यांदा लँड करण्याचा प्रयत्न केला होता . कारण ते एक उत्कृष्ट पायलेट होते. युद्धपातळीवर विमानातील प्रवाशांना वाचण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही मदत आणि बचावकार्यत आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्याचे आदेश पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाला दिले. 191 लोकांमधे 128 पुरुष 42 स्त्रिया, दहा मुले आणि 7 क्रू मेंबर होते. यामध्ये एअर फोर्स चे रिटायर्ड विंग कमांडर दीपक वसंत साठे होते. विमान साठे आणि को पायलेट अखिलेश कुमार हे उडवत होते. साठे यांनी प्लेन सुरक्षित लँड करण्याचा खूप प्रयत्न केला. कारण ते एक उत्कृष्ट पायलेट होते. साठे वायुसेनेमध्ये टेस्ट पायलट होते. ते N.D.A. che पासआऊट होते. त्यांचे भाऊ कारगीलच्या युद्धात शहिद झाले.त्यांचे वडील देखील भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाले.कोझिकोड धावपट्टीचा विचार केला असता मागील वर्षी डीजीसीए सूचना केल्या होत्या की कोझिकोड एअरपोर्ट पावसाळ्यातील लँडिंग साठी सेफ नाही. पावसाळ्यात विमानाच्या लँडिंग साठी धोकादायक असल्याची सूचनाही त्यांनी दिली होती. यावर लवकरात लवकर उपाय करण्याचे आदेश देखील दिले होते.

