पुणे : पुणे महापालिकेच्या स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था मर्यादित तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मागणीनुसार विविध क्षेत्रीय कार्यालयांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ८ कोटी ८ लाख ९८ हजार ९० रुपयांच्या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार विविध क्षेत्रीय कार्यालयांसाठी आवश्यक असलेल्या ४२ प्रकारच्या साहित्य व सोयीसुविधांची खरेदी करण्यात येणार आहे. निविदेतील दर बाजारभावाशी सुसंगत असल्याचा दावा प्रशासनाने केला असून या खर्चासाठी संबंधित अर्थशीर्षांवर आवश्यक निधी उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
