Share this post:


​पिंपरी: पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर आता ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये करण्यात येणार आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. स्थानिक आमदार शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.


​या पाहणी दौऱ्याप्रसंगी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयातील सध्याच्या आरोग्य सुविधा, औषधसाठा आणि उपचार पद्धतींचा आरोग्यमंत्र्यांनी बारकाईने आढावा घेतला. या दौऱ्यात रुग्णालयातील यंत्रसामग्रीचा वापर अधिक गतिमान करण्याच्या आणि रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.


​मुंबईची वारी थांबणार
यावेळी बोलताना डॉ. आबिटकर म्हणाले की, “आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून आम्ही सांगवी जिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील रुग्णांना हृदय, किडनी किंवा मेंदूविकारासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, हे आमचे मुख्य ध्येय आहे. येथे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या तोडीस तोड मोफत आणि दर्जेदार उपचार मिळतील.”


​आमदार शंकर जगताप यांची प्रतिक्रिया:
​”पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना महागड्या खाजगी उपचारांपासून दिलासा देणे, हे माझे स्वप्न आहे. आज आरोग्यमंत्र्यांनी सांगवी रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी दर्जा देण्याची जी ग्वाही दिली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘आत्मनिर्भर आणि सुदृढ भारत’ या संकल्पनेला अनुसरून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— शंकर जगताप, आमदार (चिंचवड विधानसभा)

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »