Share this post:

पुणे: राजकारणात पदे येतात आणि जातात, पण जनतेशी असलेली नाळ कायम राखणे फार थोड्यांना जमते. सक्रिय राजकारणातील २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, नगरसेवक ते सभागृहनेता असा प्रवास, तरीही मनातून कायम ‘सामान्य कार्यकर्ता’ हीच ओळख जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे गणेश बिडकर. प्रभाग २४ (कसबा पेठ परिसर) मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून बिडकर आज पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात सज्ज झाले आहेत.

नगरसेवक ते सभागृहनेता: मुत्सद्दीपणा आणि विकास

​२००२ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर बिडकर यांनी मागे वळून पाहिले नाही. २०११-१२ मध्ये, महापालिकेत सत्ता नसतानाही केवळ आपल्या मुत्सद्दीपणामुळे त्यांनी ‘स्थायी समितीचे अध्यक्षपद’ मिळवले. या काळात त्यांनी प्रभागातील प्रलंबित कामांना गती दिली. पुढे २०२०-२२ या काळात सभागृहनेता म्हणून त्यांनी पुणे शहराच्या हिताचे अनेक मोठे निर्णय मार्गी लावले.

कामांचा डोंगर आणि सांस्कृतिक वारसा

​बिडकर यांनी केवळ रस्ते आणि पाण्याचे राजकारण न करता कसब्याचा सांस्कृतिक वारसा जपण्याला प्राधान्य दिले.

  • मंदिर जीर्णोद्धार: ऐतिहासिक श्री नागेश्वर मंदिर आणि त्रिशुंड गणपती मंदिराचा कायापालट.
  • आरोग्य सुविधा: कमला नेहरू रुग्णालयाच्या कामांना दिलेली गती.
  • पायाभूत सुविधा: मेट्रो आणि ‘जायका’ (नदी सुधार) प्रकल्पांना दिलेली मंजुरी.
  • मोठे प्रकल्प: २४ तास पाणीपुरवठा, नदी पुनरुज्जीवन आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्पांना दिलेली गती.

नात्यांची वीण आणि साधेपणा

“समाजाशी असलेली बांधिलकी, विकासाचा ध्यास आणि पक्षाशी असलेली एकनिष्ठा यामुळेच गणेश बिडकर आज कसब्यातील एक विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखले जातात.”

​गणेश बिडकर यांच्या यशाचे गमक त्यांच्या साधेपणात आहे. वडिलांपासून मिळालेला जनसेवेचा वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे चालवला आहे. “नागरिकांनी आवाज दिला की घरातील सदस्याप्रमाणे धावून जाणारा नेता” अशी त्यांची ख्याती आहे. प्रशासकीय कामांचा अनुभव आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण यामुळेच त्यांना प्रत्येक निवडणुकीत नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आला आहे.

​आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आपल्या २५ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आणि कसब्याच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन घेऊन बिडकर मतदारांना साद घालत आहेत.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »