
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरी समस्या, विकास प्रकल्प, वाहतूक आणि पायाभूत सुविधांसंदर्भातील अनेक मुद्यांवर आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यात विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत खालील प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली:
* मोरया गोसावी मंदिरासमोरील दगडी रस्ता आणि पार्किंगची देखभाल व दुरुस्ती
* राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने महानगरपालिकेला ताथवडे पुनावळे वाकड परिसरातील सर्विस रस्त्याजवळील नाले कलव्हर्ट इत्यादी मोकळे व स्वच्छ करण्याबाबत केलेला पत्रव्यवहार. त्या दृष्टीने कारवाई करून पावसाळ्यात अंडरपास खाली जमणारे पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत.
* रिलायन्स कंपनीतर्फे दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील फुटपाथ व इतर ठिकाणी टाकण्यात आलेल्या केबल्समुळे महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे झालेले नुकसानाची चौकशी संदर्भात कारवाई
* महापालिका शिक्षकांच्या विविध मागण्या
* कल्पतरू पिंपळे गुरव, पी.के चौक पिंपळे सौदागर, काळेवाडी अंडरपास व एमएम चौक पूल संदर्भातील प्रश्न
* काळेवाडी चौकातील शिवसृष्टी ट्राफिक आयलंडचे काम सुरू करण्याचे नियोजन
* वृक्षारोपणासाठी प्राईड पर्पलला देण्यात आलेली जागा भाडेपट्टा करार रद्द करून ताब्यात घेणे.
* काळेवाडी एम एम चौक येथे ग्रेड सेपरेटर करणे
* काळेवाडीत ‘लेफ्ट फ्री’ मार्गांची अंमलबजावणी
* पशुसंवर्धन जागेत पार्क आणि रिव्हर फ्रंट रिझर्वेशन योजनेबाबत प्रगती
* पुनावळे येथे ऑक्सीजन पार्क
* नवविकसित गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांसाठी आरक्षणाची पुनर्तपासणी
* भूमकर चौकात प्रत्यक्ष पाहणी करुन पुन्हा आढावा घेण्याचा निर्णय
* भूमकर चौकात ड्रेनेज लाईन टाकून दिल्यास वाहतुकीच्या दृष्टीने जागा ताब्यात येऊन वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल.
* मेट्रो प्रकल्पासाठी काळा खडक येथील जुना जकात नाका ते वाकड पोलीस चौकी पर्यंत रस्ते काम आणि अतिक्रमण हटवण्याची सूचना
* ताथवडे- पुनावळे रस्त्याच्या कामाची गती
* प्रारूप विकास आराखड्याचे भाषांतर मराठीत करण्याची मागणी
* एसटीपी कनेक्शन रद्द केल्यामुळे सोसायट्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ
* वाल्हेकरवाडी स्मशानभूमीच्या मेरी या संस्थेचे सर्वेक्षण अहवाल आला असून त्या अनुषंगाने कामाचा आढावा
या बैठकीत नागरी समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्याचा आग्रह धरला. तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने बैठका घेण्यात येतील, असेही ते म्हणाले.
—
