Share this post:

खासदार मेधा कुलकर्णी यांनी आम आदमी पार्टीचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सर्व संदर्भात काही आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
याच मेधा कुलकर्णी जेव्हा पाकिस्तानी प्रचार यंत्रणा भारतामध्ये हिंदू मुस्लिम दुही माजेल असा प्रयत्न करत होते तेव्हा त्याच पद्धतीने पुण्यासारख्या शहरातही हिंदू मुस्लिम ताण तयार होईल असा प्रयत्न करताना दिसत होत्या. यांना कोथरूड मतदारसंघातल्या मंगळसूत्र चोराना, कोयता गँग अजून आवरता आलेले नाही. सिंदूर संदर्भातल्या सामान्य महिलांच्या भावना त्यांना समजलेल्याच नाहीत. भाजपने ‘ घरघर सिंदूर ‘ हा कार्यक्रम मागे घेतला आहे. परंतु मेधा कुलकर्णी यांना हा कार्यक्रम राबवायचा आहे का? आजही पंजाब मधील घरटी एक सदस्य हा सैन्यामध्ये असतो. पंजाब ही भगतसिंगाची भूमी आहे त्यामुळे भाजप ने देशप्रेम त्यांना शिकवण्याची गरज नाही. आणि त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही.

व्यापार विषयक धमकी दिली जात आहे. यावर अजूनही पंतप्रधान कार्यालया मधून उत्तर का दिले नाही, कुठल्याही बाबीचे खंडन का केले गेले नाही याचे स्पष्टीकरण मेधा कुलकर्णी यांनी यात बळी पडलेल्या महाराष्ट्रीयन कुटुंबांना द्यायला हवे.

मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी,Maharashtra

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »