Share this post:

श्वास घेतांना होत होता त्रास


मुंबई : अभिनेता संजय दत्त यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांनी रॅपिड कोविड टेस्ट केली. परंतु ती टेस्ट निगेटिव्ह आली.

आता संजय दत्त यांच्या इतर तपासण्या रविवारी केल्या जातील. सर्व चाचण्या करून श्वास घ्यायला त्रास का होत आहे याचे कारण शोधले जाईल॰ की जेणेकरून त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकतील. संजय दत्त पूर्णतः बरे झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्या जाईल असे डॉक्टरांनी सांगितले.

अभिनेता संजय दत्त यांच्यावर लीलावती रुग्णालयातील डॉ. जलील परकार आणि त्यांची टीम उपचार करीत आहे. संजय दत्त यांचे चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करीत आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »