मुबई : शनिवारी सोशल मीडियावर सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सानियाचा पार्टीतील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती तिच्या भावी पतीसह व मित्रांसोबत डान्स करताना आनंदी दिसत आहे. यामुळे अशी आनंदी मुलगी आत्महत्या कशी काय करू शकते असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
दिशा सानियाच्या आत्महत्येने हिंदी चित्रपट सृष्टीत खळबळ पसरवली आहे. दिशेचा आत्महत्येचा संबंध अभिनेता सुशांत सुशांत सिंह च्या आत्महत्या सोबत सोशल मीडियावर जोडला जातोय. या घटनेने दिशा चे आई वडील देखील भाऊक झाले आहेत. त्यांच्या मुलीचे अशाप्रकारे नाव जोडल्या जात असल्याने ते ते चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी देखील करीत आहे .विविध माध्यमांसमोर त्यांनी त्यांचे दुःख व्यक्त केले.

मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, हा व्हिडिओ तिच्या मृत्यूच्या एका तासापूर्वीचा आहे. व्हिडिओत दिशा मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ दिशाने 8 जूनच्या रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी आपल्या मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट करून तिने तिचा आनंद व्यक्त केला होता. व्हिडिओ तिचा होणारा पती रोहन,मित्र नील, दीप आणि हिमांशू देखील आहे. दिशाचे अनेक डील फसल्यामुळे ती तणावात होती. पार्टीतुन अचानक फोनवर बोलत असताना ती दुसऱ्या रूम मध्ये निघून गेली.आणि आतून दरवाजा बंद करून घेतला बऱ्याच वेळ दिशाबाहेर आली नसल्याने तिच्या मित्रांनी दरवाजा वाजवला ती दरवाजा उघडत नसल्याने शेवटी त्यांनी दरवाजा तोडला.दिशा रूम मध्ये कुठेही दिसत नव्हती परंतु त्यांनी खिडकीतून खाली बघितले तर बरीच लोकं गोळा झाली होती. नंतर सर्व मित्र कंपनी पळत खाली गेले. ते दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण दिशा खाली पडली होती. त्या ठिकाणी तिचा मृत्यू देखील झाला. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांच्या तपासात दिशाने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. परंतु 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . त्यानंतर दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचे काही कनेक्शन आहे का, असेही प्रश्न चाहत्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केले. सुशांत आत्महत्या प्रकरण तपास करण्यासाठी बिहार पोलीस देखील आले होते त्यांनीदेखील दिशांच्या आत्महत्येची चौकशी केली. आता दिशाच्या मृत्यूच्या 57 दिवसांनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित लोकांकडे माहिती असल्यास मागितली आहे. जेणेकरून खरच दिशाच्या व सुशांतच्या आत्महत्ये मध्ये काही संबंध आहे का याचा निष्कर्ष काढण्यास पोलिसांना मदत मिळू शकेल.
