पिंपरी: “पिंपरी चिंचवड शहरात सध्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत सकारात्मक आणि ‘फिलगुड’ वातावरण आहे. केवळ प्रभाग २१ मध्येच नव्हे, तर संपूर्ण शहरात जनतेचा कल राष्ट्रवादीकडे झुकला आहे. आगामी महापालिकेत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता येईल आणि शहराचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल,” असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संदीप वाघेरे यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत ते बोलत होते. यावेळी जनसंपर्कादरम्यान नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
विकासाचा ‘रिपोर्ट कार्ड’ घेऊन जनतेच्या दारी
संदीप वाघेरे यांनी गेल्या पाच वर्षांत नगरसेवक म्हणून केलेल्या कामांचा पाढाच यावेळी वाचला. केवळ आश्वासनं नाही तर प्रत्यक्ष कृतीवर त्यांनी भर दिला:
- आरोग्य क्रांती: गोरगरीब रुग्णांसाठी जिजामाता हॉस्पिटलचे नूतनीकरण करून ते अद्ययावत केले.
- संकट काळातील आधार: कोविडच्या भीषण काळात २४ तास रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली.
- पायाभूत सुविधा: संजय गांधी नगरमधील पावसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. झोपडपट्टी परिसरात भूमिगत विद्युत केबल आणि काँक्रिट रस्त्यांचे जाळे विणले.
- श्रद्धास्थानांचे संवर्धन: महर्षी वाल्मिकी आणि गणेश मंदिर बांधकामासाठी विशेष सहकार्य केले.
“आम्ही कामाच्या जोरावर मते मागत आहोत. प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करा.” — डब्बू आसवानी (माजी उपमहापौर)
‘पॅनेल २१’ चा झंझावात!
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम असे तगडे पॅनेल मैदानात उतरवले आहे. या चारही उमेदवारांनी पिंपरी गावात घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले, तर तरुणांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
प्रचारफेरीत नेत्यांची मांदियाळी
या प्रचार फेरीत पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, श्रीरंग शिंदे यांच्यासह मीनाताई नानेकर, गिरीजा कुदळे, रुपेश कुदळे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. व्यापारी वर्ग आणि स्थानिक रहिवाशांनीही या रॅलीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
पिंपरीच्या विकासाची धुरा पुन्हा एकदा अनुभवी हातांत देण्यासाठी नागरिक सज्ज असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा:
