
मराठा क्रांती मोर्चा चे राजेंद्रजी कोंढरे, राजेंद्रजी कुंजीर, अनिल ताडगे, सचिन आडेकर, आबा जगताप, श्रुतिका पाडाळे, संगीता भालेराव, जयश्री साळुंखे, देवदास लोणकर , किशोर मोरे, प्रकाश सुपेकर , अभिजीत ताठे, राकेश भिलारे आदींसह मराठा क्रांती मोर्चा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र कोंढरे म्हणाले ” मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा आहे त्याचप्रमाणे सुशासनासाठी व न्यायासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये अलौकिक आहे. “
राजेंद्र कुंजीर म्हणाले ” वीर रणांगणा ताराराणी साहेबांनंतर जर कुठल्या महिलेने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपल्या पराक्रमाचा आणि कार्याचा ठसा उमटवला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनीच अशा या कर्तुत्वान महिलेला मानाचा मुजरा.”
कार्यक्रमाचे प्रस्तावना अनिल ताडगे यांनी केली व आभार सचिन आडेकर यांनी मानले.
