पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी)
माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश आले. यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी प्रयत्न केले. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर डब्बू आसवानी यांनी पिंपरी मध्ये पत्रकार परिषदेत आपली नाराजी दूर झाल्याचे सांगितले. आगामी काळात व्यापाऱ्यांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी अजित दादांनी शब्द दिला आहे. त्यामुळे अजित दादांच्या शब्दापुढे आपण तसेच पिंपरीतील व्यापारी जाणार नाहीत असे आश्वासन डब्बू आसवानी यांनी दिले.

पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार उमा खापरे, योगेश बहल, चंद्रकांता सोनकांबळे, कुणाल वाव्हळकर, दीपक मेवानी, शितल शिंदे, संदीप वाघेरे, हरीश ललवानी, डब्बू आसवानी, प्रसाद शेट्टी, जगन्नाथ साबळे, रोहित काटे, शैलेश मोरे, जगदीश शेट्टी, जयेश चौधरी, बाळासाहेब भागवत, तुषार हिंगे, हरीश बोदानी आदी उपस्थित होते.

डब्बू आसवानी म्हणाले, पिंपरीतील व्यापाऱ्यांच्या काही मागण्या होत्या. त्या मागण्या पूर्ण करण्याचा अजित पवार यांनी शब्द दिला. व्यापाऱ्यांची अडचण आता माझी अडचण आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर त्यावर तात्काळ काम केले जाईल, असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे. दादांच्या शब्दापुढे पिंपरीतील व्यापारी जाणार नाहीत. पिंपरी मधून 50 हजार पेक्षा अधिक मतदान आमदार अण्णा बनसोडे यांना मिळेल, यासाठी आम्ही काम करणार आहोत.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, पिंपरी मधील व्यापाऱ्यांच्या काही मागण्या होत्या. त्यामुळे त्यांचा तात्विक गैरसमज झाला होता. अजित पवार यांनी याबाबत मध्यस्थी केली आहे. महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी काम करण्याच्या सूचना अजित दादांनी केली आहे. पिंपरी मधील व्यापारी वर्ग महत्त्वाचा आहे. त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत पुढील काळात निश्चित काम केले जाईल.

मागील काळात डब्बू आसवानी यांना विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काम करण्याची विनंती केली. मात्र डब्बू आसवानी यांनी त्यास नकार दिला. एक वेळ तटस्थ राहू. पण अजित दादांच्या विरोधात काम करणार नाही, अशी भूमिका डब्बू आसवानी आणि पिंपरीतील इतर व्यापाऱ्यांनी घेतली. त्यामुळे त्यांच्या मागण्यांबाबत आपण सर्वार्थाने निश्चित काम करणार असल्याची ग्वाही योगेश बहल यांनी दिली.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, पिंपरी मधील व्यापाऱ्यांना माझे कायम सहकार्य राहिले आहे. भविष्यात देखील सहकार्य राहील. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील. पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना अजित दादांनी सर्वांना एकत्र घेऊन काम केले. त्यामुळे अजित दादा हेच उमेदवार आहेत असे समजून सर्वांनी काम करावे. पुढील काळात व्यापाऱ्यांना जी मदत लागेल ती करणार असल्याचा शब्द अण्णा बनसोडे यांनी दिला.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »