उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पाठपुरावा केल्याने दाट वस्ती आणि गावठाण भागात बांधकाम करताना 18 मीटरपेक्षा जास्त खोली असलेल्या भूखंडावर साइड मार्जिन सोडण्याची सक्ती शिथिल करण्यात आली, त्यामुळे जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केल्याचा दावा कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केला.

रासने यांच्या प्रचारार्थ आज गाडीखाना हॉस्पिटल, फडगेट पोलीस चौकी, पानघंटी चौक, राष्ट्रभूषण चौक, खडकमाळ आळी, पंच हौद चर्च, शितळादेवी चौक, महाराणा प्रताप चौक, काची आळी, फूलवाला चौक परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक अजय खेडेकर, रुपाली ठोंबरे पाटील, आरती कोंढरे, सम्राट थोरात, विजयालक्ष्मी हरिहर, अजय दराडे, गणेश काची, निलेश जगताप, अभिजीत राजपूत, वैशाली नाईक, निर्मल हरिहर यांची प्रमुख उपस्थिती होती.यांचा प्रमुख सहभाग होता.

रासने म्हणाले, “मध्य वस्तीत बांधकाम करताना अनेक अडचणी येतात. जुन्या नियमानुसार अनेक इमारतींना कोणतीही साइड मार्जिन न सोडता बांधकामास मंजुरी मिळत होती. परंतु यूडीसीपीआर नियमावलीतील बदलांनतर 15 मीटरपेक्षा जास्त खोलीच्या इमारतीसाठी एक मीटर साइड मार्जिन सोडणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यावर आम्ही हरकत घेतली. त्याची दखल घेत नियम शिथिल करण्याचा आदेश काढण्यात आला. परंतु महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात पुरेशा सवलत नसल्याने पुनर्विकास अवघड झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून नियम शिथिल करण्यात आले.”

रासने पुढे म्हणाले, “शहरातील गावठाणांमध्ये अनेक मिळकती 18 मीटरपेक्षा जास्त खोलीच्या आहेत. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून वाड्यांचा पुनर्विकास करताना दोन टक्के अतिरिक्त प्रिमियम हार्डशीप आकारून साइड मार्जीनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे वाड्यांचा पुनर्विकास वेगाने होईल आणि नागरिकांना अग्निशामक यंत्रणा, वाहनतळासह इतर सुविधा मिळतील.”

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »