पुणे : आंबील ओढा परिसरासह, पर्वती विधानसभा मतदारसंघातील नाल्यांच्या बाजूला असलेल्या रहिवासी वस्तीतील पूरस्थिती रोखण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून २०० कोटींचा निधी आणला आहे. तसेच, केंद्रशासनाने शहरात पावसाळयात उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन शहरीपूर व्यवस्थापनासाठी महापालिकेस ३५० कोटींचा निधी दिला जाणार असून या निधीतूनही मतदारसंघात विकासकामे केली जाणार असल्याची माहिती आमदार माधूरी मिसाळ यांनी दिली. मिसाळ यांच्या प्रचारार्थ बिववेवाडी परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी या भागातील नागरिकांशी संवाद साधला. वर्षा साठे, रूपाली धाडवे, भीमराव साठे, पिंटू धाडवे, मीनानाथ पराडकर, महेश कुंभार, राखी शिंदे , महेश कुंभार, संतोष नांगरे, अविनाश खेडेकर, विनीत पिंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या की, पाच वर्षांपूर्वी कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाल्याने आंबील ओढ्याला पूर आला होता. या परिस्थितीमुळे आंबील ओढा सहकार नगर अरण्येश्वर कात्रज धनकवडी दांडेकर पुलासहित अन्य भागातील जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाईन खराब झाल्या.सोसायटीलगतच्या सीमा भिंती या पडल्या. या ठिकाणी तात्पुरती कामे करण्यात आली होती. मात्र, आंबील ओढयाला सिमाभिंत बांधणे गरजेचे होते, तर, खासगी सोसायटयांमध्ये शासनाच्या निधीतून कामे होत नसल्याने अडचण होती. या भिंती बांधून देण्याची मागणी नागरिक करीत होते. बांधकाम आराखड्यानुसार सोसाय त्यांनी सीमा भिंती बांधल्या होत्या मात्र आपत्ती त्या पडल्याने बांधून देण्याची जबाबदारी महापालिका आणि सरकारची असल्याची भूमिका मांडली होती मात्र तशी तरतूद नसली तरी विशेष बाब म्हणून सोसायटी आणि भोवतीच्या भिंती बांधण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने २०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
कमी काळात अधिक पाऊस झाल्याने आंबील ओढा परिसरात झालेली मनुष्यहानी व वित्त हानी आपण अनुभवली. महायुती सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी दिल्याने सीमाभिंतींचे काम करता येईल. या कामामुळे कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यास वित्त आणि जिवितहानी टाळण्यास मदत होणार आहे.
– माधुरी मिसाळ ( महायुती उमेदवार )
या ठिकाणी होणार कामे
- निर्मल पार्क ते बागूल उद्यान सीमाभिंत पाच कोटी
- पश्चिमनगर ते सेंट झेविअर्स शाळा सीमाभिंत तीन कोटी
- खोराडा वस्ती सिंहगड रस्ता सीमाभिंत तीन कोटी
- गजानन महाराज मठामागील बाजूस सीमाभिंत तीन कोटी
- विठ्ठलनगर सिंहगड रस्ता परिसरात सीमाभिंत पाच कोटी
- मंदार सोसायटी ते चंद्रशेखर मार्ग सीमाभिंत तीन कोटी
- सावित्रीबाई नगर सिंहगडरस्ता सिमाभिंत दोन कोटी
- ईएसआयसी हॉस्पिटल ते तिरंगा हॉटेल सीमाभिंत दोन कोटी
- कटारिया हायस्कूल ते कॅनॉल सीमाभिंत पाच कोटी
- मार्केट यार्ड, मुकुंदनगर, महर्षीनगर सीमाभिंत दोन कोटी
- हिंगणे परिसर ओढ्यालगत सीमाभिंत दोन कोटी
- गुरुराज सोसायटी सीमाभिंत पाच कोटी
- के.के. मार्केट ते गुरुराज सोसायटी बिबवेवाडी उर्वरित भागात सीमाभिंत पाच कोटी