23 तासाच्या प्रवासानंतर नानावटीमध्ये दाखल
नवनीत राणा आणि रवी राणा दोघेही नानावटी रुग्णालयात भरती
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली. तीन-चार दिवस घरीच अमरावतीला उपचार घेत होत्या. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना नागपूर येथील ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
परंतु येथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. प्रकृती सातत्याने ढासळत होती. गुरुवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. तसेच त्यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या. यासाठी त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या सोबत आमदार रवी राणा देखील होते. हे दोघेही अँब्युलन्स मधून मुंबईकडे मुंबईकडे रवाना झाले होते.
नवनीत राणा यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकले. एकूण त्यांच्या घरातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली. पती आमदार रवी राणा, सासू-सासरे दोन्ही मुले 12 जण कोरोनाची लागण झाली होती.