पुणे : पुण्याच्या बहुचर्चित जम्बो कोविड केअर रुग्णालयातून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्ण गायब झाल्याच्या प्रकार उघडकीस आलाय. वारंवार विचारणा करूनही रुग्णालय प्रशासन दाद देत नसल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. जोपर्यंत रुग्णालय प्रशासन मुलीची माहिती देत नाही तोपर्यंत जम्बो कोविड रुग्णालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे या महिलेच्या आईने सांगितले.
त्यानंतर रागिणी त्याच रात्री नातेवाईकांसोबत जम्बो रुग्णालयात गेल्या असताना त्यांना तेथील डॉक्टरांनी तुमच्या मुलीला चार दिवसांपूर्वीच डिस्चार्ज दिल्याचे सांगितले. नातेवाईकांनी संपूर्ण पुणे शहरात शोधाशोध केली पण त्यांना ही महिला आढळली नाही. त्यानंतर रागिणी गमरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी मुलगी हरवल्याची तक्रारही दिली. परंतु अद्यापही तिचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी आणि जम्बो कोविड रुग्णालय प्रशासनाकडून मुलीविषयी माहिती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे रागिणी यांनी सांगितले.