
पुणे : पुणे- सोलापूर रोडवर सहजपूर फाटा आणि कासुर्डी फाट्यावर दोन वेगवेगळ्या अपघातात 6 जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाल्या आहे.

पहीला अपघात रात्री साडेअकरा वाजता सहजपूर फाट्यावर ररस्तावरील दुभाजक तोडून कंटेनरने स्विफ्ट कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात 2 जण जागीच ठार झालेत. काशीनाथ नागनाथ बंदीछोडे ,आदीत्य बंडू खडसोळे असे दोघांची नावे आहेत

तर दुसरा अपघातामध्ये कासुर्डी फाट्यावरील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या कंटनेरला पाठीमागून सेंट्रो कारने धडक दिली.या भिषण धडकेत 4 जण जागीच ठार झाले. तर एक मुलगी गंभीर जखमी आहे.



अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे सिध्देश्वर चंद्रकांत बर्डे, अनिता सिध्देश्वर बर्डे, संतोष मल्लीनाथ पाटील, शोभा शरनगोंडा पाटील हे सर्व कोंढवा परीसरात रहीवासी आहेत. तर श्वेता सिध्देश्वर बर्डे ही गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्यावर यवत ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.