खामगाव ओल्या पार्टन साठी प्रसिद्ध आहे. अशातच एका पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोरोना काळातही हा पोलीस अधिकारी चक्क त्याच्या मद्यपी मित्रांसाठी गाणे गाताना दिसत आहे. खामगावतील व्यापाऱ्यांकडे ही पार्टी रंगली होती.

बुलढाणा : कोरोना रुग्ण संख्या वाढीमध्ये महाराष्ट्र नंबर एक वरती आहे. कोरोनाचा प्रसार-प्रचार थांबवण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी पार्ट्या कार्यक्रम वर बंदी घालण्यात आली आहे. शासनाचे अधिकारी , कर्मचारी याना ही सर्वसामान्य नागरिकांन प्रमाणे नियम लावलेले आहेत. मात्र शासनाचे च वरिष्ठ अधिकारीच जर हे कोरोना चे नियम मोडून व्यापाऱ्यांसोबत ओल्या पार्ट्या करत असतील तर यांनी कोणाला नियम शिकवावे ? .. हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीय..
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हे ओल्या पार्ट्या साठी प्रसिद्ध आहे… खामगावतील असाच एक ओल्या पार्टी चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय .. मागील 2 महिने आधी ही ओली पार्टी खामगाव मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरी झालीय .. मात्र आता हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे यापूर्वीही या ठिकाणी अनेकवेळा पार्ट्या झाल्या, ही ओली पार्टी उघडकीस करण्यासाठी खामगाव एका सांज दैनिक च्या पत्रकाराने पुढाकार घेतला त्या पत्रकाराने त्यांच्या वृत्तपत्रामध्ये अनेक वेळ या पार्टी बद्दल वृत्त सुद्धा प्रकाशित केले आहे त्यामुळे तो पत्रकार पार्टी मध्ये समाविष्ठ होऊन हे पार्टी उघडकीस ही केलीय.. या पार्टीत खामगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, जिल्हा केंद्रीय बँक चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक खरात, व्यापारी ही उपस्थित होते.



यावेळी या पार्टीत पोलीस अधिकारी पाटील यांनी गाणं ही गायिले आणि पार्टीत 6 जण उपस्थित लोकांनी त्याला भरभरून दाद दिलीय.. उपविभागीय अधिकारी पाटील यांच्या गाण्याचे आणि नाचण्याचे व्हिडीओ यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत… त्यांना गाणं गाण्याचा छंद आहे… मात्र आपल्या हद्दीतील क्राईम, अवैध धंदे रोखण्यास कधीही तत्परता त्यांनी दाखविली नाही.. तर बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे सीईओ डॉ अशोक खरात हे सहकर क्षेत्रातील मोठं नाव असून राज्यातील शेतकर्यांना कर्जपुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी , लॉकडाऊन चे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांचा अभ्यास करण्यासाठी कोरोना काळात शासनाने तयार केलेल्या समितीचे सदस्य ही आहेत..
त्यामुळे शासनाच्या ज्या अधिकाऱ्यांकडे कोरोना ची जबाबदारी आहे , त्या अधिकार्यांनीच जर विना मास्क ओल्या पार्टीत करणे , हे कितपत योग्य ? , आणि सामान्य नागरिकांकानी यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी , हा पडलेला प्रश्न आहे ..