भाजप नेतृत्वाकडून मोठी जबाबदारी; १२८ नगरसदस्यीय निवडणुकीचे नेतृत्व!

पिंपरी : ( राजश्री पवार 86683 71826 )आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील आगामी महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) निवडणुकीची ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

​महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा निवडणुक प्रमुख आणि जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.

गड राखण्याचे आव्हान:

  • पिंपरी-चिंचवडची कमान: आमदार शंकर जगताप हे शहरातील १२८ नगरसदस्यीय महापालिका निवडणुकीचे नेतृत्व करणार आहेत.
  • माजी बालेकिल्ला: पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र, लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने हा गड भाजपकडे वळवला.
  • ऐतिहासिक कामगिरी: 2017 च्या महापालिका निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तब्बल 77 नगरसेवक निवडून आणत शहरात बहुमत सिद्ध केले आणि भाजपचा पहिला महापौर शहराला मिळाला.

जगताप यांच्यावर नेतृत्वाचा विश्वास का?

​संघटन कौशल्य आणि व्यवस्थापन क्षमतेसाठी ओळखले जाणारे, तसेच शहराध्यक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव असलेले उच्च विद्या विभूषित आमदार शंकर जगताप यांच्यावर भाजपने विश्वास दाखवला आहे.

पक्ष नेतृत्वाने दिलेल्या या जबाबदारीबद्दल बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक–2025 करिता मला पिंपरी-चिंचवड शहर कार्यक्षेत्रात ‘निवडणूक प्रमुखपदी’ नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे. ही माझ्यासाठी सन्मानाची व अभिमानाची बाब आहे. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला हा विश्वास मी सार्थ ठरेन याची ग्वाही देतो.”

‘विकसित शहर’ संकल्पनेसाठी माइक्रो प्लॅनिंग

​विकसित शहरांमध्ये अग्रक्रमाने गणले जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पुढील पन्नास वर्षांच्या गरजा आणि भाजपच्या संकल्पनेतील विकसित शहर या दृष्टिकोनातून पक्षाला पुन्हा एकदा शहरात ‘कमळ’ फुलवायचे आहे.

​यासाठी आमदार जगताप यांनी मायक्रो प्लॅनिंग, कार्यकर्त्यांचे संघटन आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद-सहकार्य या माध्यमातून भाजपचे कार्य व जनकल्याणकारी योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अखंडपणे कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »