१७ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला बहुचर्चित मराठी चित्रपट ‘रील स्टार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १७ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाचा भव्य प्रीमियर होणार असून, नुकताच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात त्याचा संगीत प्रकाशन सोहळा थाटात पार पडला. या सोहळ्यास चित्रपटातील कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ आणि संपूर्ण टीमची उपस्थिती लाभली. ‘सारेगामा’च्या माध्यमातून चित्रपटातील गाणी रसिकांसमोर येणार आहेत.
निर्मिती व दिग्दर्शन
जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मलदीप प्रोडक्शनचे नासिर खान व गुरविंदर सिंग हे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘अन्य’ या चर्चित हिंदी-मराठी चित्रपटानंतर दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी ‘रील स्टार’चे दिग्दर्शन केले आहे. कथा, पटकथा आणि संवाद लेखन सुधीर कुलकुर्णी (नागराज मंजुळे यांचे सहायक दिग्दर्शक) यांनी केले आहेत.
कथा
‘रील स्टार’ हा भानुदास नावाच्या रस्त्यावरील एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा आहे. स्वप्नपूर्तीसाठी झगडणाऱ्या त्याच्या प्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळेल. भानुदासची व्यक्तिरेखा भूषण मंजुळे यांनी साकारली असून, प्रख्यात अभिनेते प्रसाद ओक पत्रकाराच्या महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
कलाकार
चित्रपटात मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, प्रशांत शिंदे, करीश्मा देसले अशा दमदार कलाकारांचा समावेश आहे. बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांच्याही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
संगीत
या चित्रपटात एकूण पाच गाणी असून प्रत्येक गाणे वेगवेगळ्या प्रसंगांना अधोरेखित करते.
‘दृश्यम’ फेम विनू थॉमस यांनी चार गीतांना संगीत दिले आहे.
‘घाव दे जरा रा…’ हे गाणे ए. आर. रेहमान यांचे सहायक राहिलेले शुभम भट यांनी संगीतबद्ध केले असून, आदर्श शिंदे यांच्या आवाजात आहे.
‘गर गर गरा…’ (अभिजीत कोसंबी, सायली कांबळे – गीतकार मंदार चोळकर)
‘जगूया मनसोक्त सारे…’ (रोहित राऊत – गीतकार मंदार चोळकर)
‘का सुनं सुनं झालं…’ (मनीष राजगिरे – गीतकार गुरु ठाकूर)
‘फुलोरा…’ (मुग्धा कऱ्हाडे – गीतकार मंदार चोळकर)
तांत्रिक बाजू
रंगभूषा : भागवत सोनावणे
वेशभूषा : राणी वानखडे
कास्टिंग डायरेक्टर : दीपक पांडे
असोसिएट डायरेक्टर : रोहित कुलकर्णी
क्रिएटिव्ह निर्माता : महेंद्र पाटील
मुख्य सहयोगी दिग्दर्शक : नंदू आचरेकर
प्रोडक्शन डिझाईन : राहुल शर्मा व समीर चिटणवीस
कला दिग्दर्शन : निलेश रसाळ
भानुदासच्या संघर्षमय प्रवासातून उमटणारा आशावाद, सुमधूर गाणी आणि ताकदीची कलाकार मंडळी या सर्वांची सांगड घालत ‘रील स्टार’ हा चित्रपट प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देणार आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »