
“भारतात लक्झरीची व्याख्या झपाट्याने बदलते आहे. एमजी सिलेक्टद्वारे आम्ही ग्राहकांसाठी असा एक अनुभव तयार करत आहोत, जिथे प्रत्येक क्षण खास असेल.”
पुणे : लक्झरी ऑटोमोटिव्ह क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू करत, JSW GM मोटर इंडिया यांनी आज पुण्यात आपले पहिले ‘एमजी सिलेक्ट एक्सपिरीयन्स सेंटर’ मोठ्या दिमाखात सुरू केले. बालेवाडीतील न्याटी एम्पोरियस येथे उभारलेले हे अत्याधुनिक केंद्र कार खरेदीचा अनुभव केवळ व्यवहारापलीकडे नेत, ग्राहकांना लक्झरी, नावीन्य आणि शाश्वततेचा संगम असलेला अनोखा अनुभव देते.
हे सेंटर पारंपरिक शोरूमसारखं नसून, एका आर्ट गॅलरीच्या रूपात साकारण्यात आले आहे. पांढऱ्या आणि मातीच्या सौम्य रंगछटांमध्ये सजवलेल्या या ठिकाणी, कार्स शिल्पकृतीसारख्या सादर केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना वैयक्तिक आणि पवित्र असा अनुभव मिळतो.
JSW GM मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनुराग मेहरोत्रा म्हणाले,


एमजी सिलेक्ट पुणेचे डीलर प्रिन्सिपल श्री. विशाल अग्रवाल यांनी सांगितले,
“हे सेंटर लक्झरीचा एक नवा परिमाण उभा करते. येथे केवळ कार खरेदी नाही, तर एक समुदाय तयार होईल, जिथे प्रत्येक आकांक्षेला आदर दिला जाईल.”
ब्रँडच्या योजनांनुसार, २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत भारतातील १३ प्रमुख शहरांमध्ये आणखी १४ सेंटर सुरू होणार आहेत.
या सेंटरमध्ये ग्राहकांना जगातील सर्वात वेगवान एमजी — ‘सायबरस्टर’ आणि ‘एम९ प्रेसिडेंशियल लिमोझिन’ यांचाही भव्य अनुभव घेता येणार आहे. उद्घाटन समारंभाला ऑटोमोबाईल क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक व कारप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यातील बाणेर-बालेवाडी परिसरात लक्झरी कार अनुभवाचा नवा अध्याय – ‘एमजी सिलेक्ट’