
छत्रपती संभाजीनगर : राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात आज आरोग्य हक्कांवर सखोल चर्चा झाली. औंध जिल्हा रुग्णालय संवाद समिती मॉडेलची प्रभावी मांडणी करत खाजगी रुग्णालयांवरील नियंत्रणासाठी महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टमधील तरतुदी समोर ठेवण्यात आल्या.
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या 70 कार्यकर्त्यांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्हा रुग्णालय समिती मॉडेलची परिणामकारकता पाहता, ते राज्यभर राबवण्याची गरज असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे मांडले.
शिबिरात “आरोग्य हा हक्क आहे, सेवा नाही” हा संदेश अधोरेखित करत, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील लोकसहभागाची गरज अधोरेखित करण्यात आली.

