
पिंपरी-चिंचवड : तळवडे येथील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागील बाजूस एका पुरुष आणि महिलेला डोक्यात दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना मध्यरात्री १ ते २ वाजताच्या दरम्यान घडली असून, अनैतिक संबंधातून ही दुहेरी हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दत्तात्रय लक्ष्मण साबळे वय 49 वर्ष या आरोपीला दुहेरी हत्याकांडात देहू रोड पोलिसांनी ताब्यात घेतले.
मृत व्यक्तींची नावे:
जगन्नाथ पुंडलिक सरोदे (५६ वर्षे)


मंगला सुरज टेंभरे (३० वर्षे)
या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले असून, घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या गुन्ह्याचा तपास सुरू असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि परिसरातील लोकांकडून माहिती घेत आहेत