
भाजप सरकारमध्ये महिला पोलीस अधिकारी सुरक्षित नाही तर सर्व सामान्यांचे काय ?

नितीन गडकरी दौऱ्यावर असतानाच हा प्रकार घडला
पुणे : महिला पोलीस अधिकारी बंदोबस्तात असताना प्रमोद कोंढरे यांनी गैरवर्तन केले.

प्रमोद कोंढरे हे हेमंत रासने यांचे खंदे समर्थक आहे. कसबा विधान मतदारसंघाची निवडणूक त्यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. सध्या त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. भाजप नेते गिरीश बापट यांचेही ते निकटवर्ती होते. गिरीश बापट यांचे देखील ते कामकाज बघत होते. विश्राम बागवाडा येथील पहिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखलn केला गेल्याने सर्वत्र खळबळ पसरली आहे.
नितीन गडकरी सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला. नितीन गडकरी हे पुण्यातील शनिवार वाडा ते सारसबाग येथील भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते. . यावेळीच प्रमोद कोंढरे यांनी विश्रामबागवाडा येथील महिला पोलीस अधिकाऱ्यांची गैरवर्तन केले असा आरोप करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच हा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला गेला. पोलीस अधिकारी असून देखील हा गुन्हा दाखल व्हायला संपूर्ण एक दिवसाचा कालावधी लागला. या घटनेची संपूर्ण पारदर्शक चौकशी होईल असेही पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले. परंतु पुणे शहरामध्ये पोलीस जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य महिलांचे काय असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जातो

