महाराष्ट्रातील नव्हेच अखंड भारतातीलच काय परदेशी भक्तांना मराठी महिन्याच्या आषाढ महिन्यातील आषाढी वारीची उत्कंठा शिगेला लागून राहत असते. या वारीत दिंडीत अनेकानेकांना विद्यापीठीय पुस्तकी शिक्षणापेक्षा जीवनातील कित्येक पटीने ज्ञानुभव देत असते. या वारी दिंडीत वैष्णवांचा मेळा आपल्या विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी भेटी लागी जिवा एक उरामध्ये ऊर्जा नि ओढ घेऊन पायी चालत मार्गक्रमण करत असतो. संत गाडगे महारांजाच्या उक्तीप्रमाणे देव दगडात नसून देव कायमस्वरूपी माणसात असतो. म्हणूनच एस व्ही हेअर स्टुडिओ अकॅडमीचे संचालक श्री विजय वाघमारे सर आणि श्रीमती शिल्पा जयमनी यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमवेत आपण या समाजाचे देणं लागतो या प्रांजळ भावनेतून माणुसकी धर्म निभावत देहू येथून निघणाऱ्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारांच्या पालखीतील वारकरी भक्तांची सेवा केस कापून ,दाढी करून ,त्यांच्या मालिश करून सेवा अर्पण केली आहे.


वास्तविक पाहता या आजच्या आर्थिक स्पर्धेच्या धावपळीच्या युगात आपण समाजाचे देणं लागतो या भावनेतून बॅक टू सोसायटी म्हणून अशी निस्वार्थ भावनेनं काम करणारी लोकं कमी असतात .केलेल्या कामाचा गवगवा न करता आपल्या विधायक मार्गाची पायवाट महामार्गाच्या दिशेने आपसूक जात असते पर्यायाने प्रेमाने जग जिंकता येते याची प्रचिती साक्षात या आळंदीच्या ज्ञानेश्वराच्या दिंडीतील माऊलींच्या सेवेतून परमार्थ घडून महत्तभाग्य प्राप्त होत असते. याची देही याची डोळा हे सुख, त्याग, सेवा, समर्पण , ही चतुसूत्री राबवून हे शिल्पा मॅडम नि विजय सर हे दांपत्य विठ्ठल सेवा करतात हे वाखाणण्याजोगे आहे.नव्हे समाजातील सर्वांनी घ्यावा असा पायंडा पाडत आहेत हे मात्र नक्की खरं.

खरोखरच एखाद्या व्यक्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच असते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्यांची सेवा बजावून
एस व्ही हेअर स्टुडिओ अकॅडमी चे मालक विजय वाघमारे आणि शिल्पा जयमनी हे आपण “इतरांसाठी काहीतरी करूच शकतो” या भावनेने ते समाज कार्य करतात.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »