
फ्लॅट व्यवहारात दिशाभूल करून हरिप्रकाश ग्यानी राम अग्रवाल यांची फसवणूक केल्याचा आरोप
फ्लॅटच्या व्यवहारातील खरेदी खत त्यातील नियमन प्रमाणे निश्चित केलेली रक्कम अदा करूनच कोथरूड येथे हरिप्रकाश ग्यानीराम अग्रवाल यांनी फ्लॅट खरेदी केला होता. फ्लॅट खरेदी करताना त्या घराचे मूळ मालक यांनी फ्लॅटवर कर्ज आहे याबद्दल अंधारात ठेवून हा व्यवहार केला. असा आरोप ज्येष्ठ नागरिक हरिप्रकाश ग्यानीराम अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन केला
फ्लॅटवर पूर्वीच्या मालकांनी फायनान्स कंपनीचा बोजा संदर्भात अंधारात ठेवून त्यांची फसवणूक केली. याबाबत अग्रवाल यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे तक्रार देखील दाखल केली आहे. संबंधित आरोपीं विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कठोर कारवाई व्हावी तसेच फायनान्स कंपनीकडे पहिले घराचे पहिले मालक यांची गहाण असलेली हॉस्पिटलची सुमारे 51 कोटी रुपये किमतीची इमारत जप्त करून त्यांनी त्यांचे पैसे वसूल करावे आणि लाखात किंमत असलेल्या अग्रवाल यांच्या फ्लॅटला फायनान्स कंपनीच्या दुष्टचक्रातून वगळावे की जेणेकरून माझ्यावरील अन्याय दूर होईल आणि आता या वयात म्हणजे म्हातार वयात बेघर व्हावे लागणार नाही यासाठी फायनान्स कंपनीने संबंधित व्यक्तीवरच कारवाई करावी. अशी मागणी पत्रकार परिषदेत केली
संबंधित आरोपींविरोधात फसवणूक केल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी, तसेच फायनान्स कंपनीकडे आरोपींची गहाण असलेली हाॅस्पिटलची सुमारे ५१ कोटी रुपये किमतीची इमारत जप्त करून त्यांनी आपले पैसे वसूल करावे आणि काही लाखात किंमत असलेल्या माझ्या फ्लॅटला या फायनान्सच्या दुष्टचक्रातून वगळावे, तसेच मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही स्थितीत बेघर करू नये, अशी मागणी पुण्यातील प्रतिष्ठित व्यापारी व ज्येष्ठ नागरिक हरिप्रकाश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.
हरिप्रकाश अग्रवाल या वेळी बोलताना म्हणाले की, सद्यःस्थितीत मी फ्लॅट नं. बी-२०१, बी-विंग, श्री वेंकटेश रेसिडेन्सी, सर्व्हे नं. ९८, प्लाॅट नं. ४९, ५० कोथरुड, पुणे -४११०३८ येथे राहतो. मी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करून जमा केलेल्या कमाईतून दि. २७-०५-२०२२ रोजी दिनेश रामदास किरवे या व्यक्तीकडून रु. ६४,००,०००/- (अक्षरी रुपये चौसष्ट लाख फक्त) देऊन ९२५ स्क्वेअर फुट आकाराचा एक फ्लॅट (पत्ता – फ्लॅट नं. बी-२०१, बी-विंग, श्री वेंकटेश रेडिसेन्सी कोथरुड पुणे) अधिकृतरित्या खरेदीखत करून विकत घेतला व सध्या तेथेच राहत आहे.
या फ्लॅटची ठरल्या प्रमाणे पूर्ण रक्कम मी फ्लॅटचे मालक दिनेश रामदास किरवे (रा. मु. पो. कुडाळ, ता. जावळी, जि. सातारा – ४१२८०३) यांना अदा केलेली आहे. हा फ्लॅट खरेदी करताना फ्लॅटचे मालक दिनेश किरवे यांनी मला स्पष्टपणे सांगितले होते की, फ्लॅटवर कोणतेही कर्ज, फायनान्स यांचा बोजा नाही. घराचे पूर्ण टायटल क्लियर आहे. फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी मी यासंदर्भात चौकशी केली व त्याबाबतची खात्री केली. दिनेश किरवे यांनी मला त्या वेळी वकील अॅड. सुमेध कुलकर्णी यांनी तयार केलेला फ्लॅटचा सर्च रिपोर्टदेखील दाखवला होता. या सर्च रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद होते की, या फ्लॅटवर कुठल्याही बँकेचे कर्ज किंवा फायनान्स कंपनीचा बोजा नाही.
त्यानंतर मग मी फ्लॅट खरेदी केला. खरेदीखत झाल्यानंतर अचानक १ जुलै २०२२ रोजी मला एक नोटीस प्राप्त झाली आणि हवेली तहसीलचे कार्यकारी न्यायाधीश / निवासी नायब तहसीलदार हे माझ्या घरी आले व त्यांनी या फ्लॅटवर फायनान्स असल्याचे सांगितले. माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. मला अधिकाऱ्यांनी सांगितले की, माझ्या फ्लॅटवर फिनिक्स एआरसी प्रा. लि. कंपनीचा बोजा आहे. तसेच कर्जाची रक्कम या फ्लॅटच्या पूर्वीच्या मालकीण सुनंदा जगताप यांनी न भरल्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हवेली तहसीलचे कार्यकारी न्यायाधीश निवासी नायब तहसीलदार या घराचा ताबा घेण्यासाठी आले आहेत. त्यानंतर मी अधिक चौकशी केली असता मला समजले की, फ्लॅच्या पूर्वीच्या मालकीण सुनंदा जगताप (रा. २८०/१, २, धनगरवाडी, शिरवळ, खंडाळा, जि. सातारा – ४१५००२) व दिनेश किरवे या दोघांनीही संगनमत करून फिनिक्स एआरसी प्रा. लि. कडून त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या वाई येथील हाॅस्पिटलची इमारत गहाण ठेवून रु. १७ ते १८ कोटी रुपयांचे फायनान्स घेतले आहे. त्यात त्यांनी मी विकत घेतलेला फ्लॅटदेखील गहाण म्हणून दाखवला आहे, परंतु सुनंदा जगताप व दिनेश किरवे यांनी ही बाब जाणुनबुजून लपवून ठेवली व माजी फसवणूक केली. खरेतर आरोपी सुनंदा जगताप आणि दिनेश किरवे यांचा फिनिक्स एआरसी प्रा. लि. सोबत जो काही आर्थिक व्यवहार झालाय, त्याचाशी माझा काहीही संबंध नाही. मी रितसर नियमाप्रमाणे फ्लॅटची खरेदी केलेली आहे. सध्या हे प्रकरण ट्रिब्युनलमध्ये गेलेले असल्या कारणाने सध्या त्याची सुनावणी सुरू आहे, परंतु माझी मागणी आहे की सुनंदा जगताप आणि दिनेश किरवे यांनी जे काही लोन घेतलेले आहे, त्याची वसुली फिनिक्स एआरसी प्रा. लि. ने त्यांची हाॅस्पिटलची इमारत ज्याची आज बाजारभावाने किंमत ५१ कोटी रुपये आहे, ती जप्त करावी व आपली रक्कम वसूल करून घ्यावी. परंतु या प्रकरणात मला व माझ्या परिवाराला नाहक बेघऱ करू नये व आम्हाला मानसिक त्रास देऊ नये. कारण फायनान्स कंपनीला आरोपींकडून घ्यावयाची रक्कम ही कोटयवधींच्या घरात आहे आणि माझ्या फ्लॅटची किंमत केवळ ६४ लाख रुपये आहे. खरेतर या संपूर्ण फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.