
पुणे ( राजश्री अतकरे पवार )
सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळ पुण्यात भरधाव कार ने एमपीएससी करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवले. या अपघातात हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. बाराही जखमी विद्यार्थ्यांवर मोडक आणि संचेती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताचं स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा जे काही नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांचा सर्वच हॉस्पिटलचा खर्च करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

शनिवारी पाच वाजता नेहमीप्रमाणे हे एमपीएससी करणारे विद्यार्थी टपरी वरती चहा पीत होते. अचानक सुसाट अशी टुरिस्ट होंडाई ओरा कार आली आणि या कारणे टपरीला धडक दिली. या कारणे हे विद्यार्थी बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत नेले. यातील कारचालक मद्यप्राशन केलेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारचालकाचे नाव जयाराम शिवाजी मुळे आहे.. कारचालक जयराम मुळे हा सदाशिव पेठेत मेडिकल दुकानात काम करतो. त्याला गाडी चालवता येत नाही त्याच्याकडे लायसन नाही तरी देखील त्याने चालवण्यासाठी मित्राची गाडी घेतली. त्याचा मित्र देखील गाडीच्या बाहेरच उभा होता. या चालकाला गाडी चालवता येत नसून देखील त्यांनी एका मित्राला गाडीत बसवलं. गाडी चालवू लागला पुढल्या चौकात त्याने टपरीला धडक देऊन या विद्यार्थ्यांना फरफटत नेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक जयराम शिवाजी मुळे याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले असतात. संपूर्ण घटनेचा तपास विश्रामबाग येथील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मला पवार करीत आहेत.