पुणे : परत एकदा तात्पुरत्या कारागृहातून दोन कैदी पळून कारागृहातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच कारागृहातून कैदी पळून गेले होते. परंतु त्यांना पकडण्यात आले होते. आता या दोन कोरोना बाधित फरार कैद्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

पुणे शहर कोरोना रुग्णसंख्या च्या बाबतीत भारतात नंबर एक वर पोहोचले आहे. कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवेबाबत पुण्याचे अक्षरशः आधीच धिंदोडे निघालेले आहे. अशातच तात्पुरत्या कारागृहातून या दोन कैद्यांचे पलायन कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरते. यामुळे मात्र परत एकदा कारागृह प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे .आणि जागोजागी या वैद्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला फरार कैदी अनिल विठ्ठल वेताळ (वय 21) राहणार गणेश नगर, भीमा कोरेगाव, ता-शिरूर, जि- पुणे येथील रहिवासी आहे. या
या आरोपी वरती भादवी कलम प्रमाणे 307, 394, 441, 34 IPC अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.


तर दुसरा फरार कैदी विशाल रामधन खरात हा फातिमा मज्जित समोरिल श्री समर्थ हौसिंग सोसायटी निगडी पुणे येथील रहिवासी आहे. या आरोपी वरती पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये भादवी प्रमाणे 225, 307, 323, 143 147, 148, 149 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. दोघांवरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ते न्यायालयीन कोठडी तील आरोपी तात पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक १०४ मधील पहिल्या मजल्यावरील रुम नंबर १ मध्ये ठेवण्यात आले होते. हे आरोपी पळण्याच्या तयारीत असताना त्यांना संधी मिळाली, आणि त्यांनी पळ काढला. कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आणि या दोन्ही कैद्यांचा तपास सुरू झाला. तसेच हे दोन्ही कैदी कोरोना बाधित असल्याने युद्धपातळीवर तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेताळ आणि खरात हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना . संधीचा फायदा घेत त्यांनी येथून पळ काढला.येथील गस्तीवरील हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ येरवडा पोलिसांशी संपर्क साधला. येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिक्रापूर आणि निगडी पोलिसांना माहिती दिली आहे.
दोन्ही कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वीही तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून गेले होते. यातील काहींना नंतर पुन्हा अटक करण्यात आली होती.