पुणे : लहुजी शक्ती सेनेच्या पक्षिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी यमराजभाऊ खरात यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत यमराज खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लहुजी शक्ती सेनेचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष हेमंत भाऊ खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत यमराजभाऊ खरात यांची लहुजी शक्ती सेनेच्या पक्षिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यमराज खरात यांनी यापूर्वी देखील राज्यात लहुजी शक्ती सेनेच्या अत्यंत महत्वपूर्ण पदाची जबाबदारी सांभाळली आहे. यमराज खरात यांची
लहुजी शक्ती सेनेच्या पक्षिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याने ते निश्चितच पक्षिम महाराष्ट्रातील मातंग आणि इतर सर्व जाती जमातीच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करतील असा विश्वास यावेळी लहुजी शक्ती सेनेचे कोअर कमिटीचे प्रदेशाध्यक्ष कैलासभाऊ खंदारे यांनी व्यक्त केला. यावेळी यमराज खरात यांना कैलासभाऊ खंदारे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या पक्षिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली