दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी “लायन्स कराटे क्लब पुणे” नऱ्हेच्या मुख्य शाखा येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे मा. नगरसेविका स्मिता (ताई) कोंढरे, ॲड. दिलीप जगताप संस्थापक जनहित फाउंडेशन, वरिष्ठ पत्रकार सचिन कोळी, पांडुरंग मरगजे पत्रकार लोकमत, नरेंद्र पारखे संपादक पुणे सत्ता, आर्यन सूर्यवंशी संस्थापक-आर्यन पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज नऱ्हे. व प्रशिक्षक ओमकार पारखे सर, शिवराज जेजुरे सर, मारुती जाधव सर ,सुरज पवार सर, धवल पारखे सर, ओमकार वनारसे सर व “लायन्स कराटे क्लब पुणे” यांच्यावतीने उत्तुंग कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व विशेष सत्कार कु. वैष्णवी प्रसाद पुंडे हिने धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले होते म्हणून तिचा सत्कार करण्यात आला.