पुणे :  छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. रविवारी त्यांनी वडारवाडी भागात पदयात्रेद्वारा मंतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी स्थानिक समस्या सोडविण्याबरोबरच या भागातील मुलं, मुलींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार असल्याची माहिती दिली. 

रविवारी सकाळी मनीष आनंद यांच्या पदयात्रेला वडारवाडी येथून सुरुवात झाली,शिवा ग्रुप,जय मित्र मंडळ,महाले नगर, मांजाळकर चौक मार्गे पीएमसी कॉलनी येथून गुंजाळकर कॉलनी येथे पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी अजहर शेख, समद शेख यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. 

या प्रसंगी मनीष आनंद यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, याभागात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, शालाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक आहे यामुळे या परिसरातील मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून

देण्यासाठी  राज्य सरकारच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार असल्याचे सांगितले आणि हे सेंटर स्थानिक मुलं, मुलींसाठी मोफत असेल असेही सांगितले.  तसेच जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी पुढाकार घेऊ असे सांगत  पुनर्विकासाचे फायदे स्थानिक नागरिकांना समजावून सांगितले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »