पुणे: साऊथ इंडियन बँक आपल्या नवीन दिवाळी ब्रँड फिल्म ‘रिश्तों से है दिवाळी, हर दिन’ सादर करत आहे. ही भावपूर्ण मोहीम सुंदरपणे दाखवते, दिवाळी फक्त चार दिवसांचा सण नसून, ती दररोज आप्तस्वकीयांसोबत आनंद, प्रेम आणि नातेसंबंध साजरे करण्याचा उत्सव आहे.
या ब्रँड फिल्मद्वारे, साऊथ इंडियन बँक त्यांच्या “१९२९ पासून नातेसंबंधांमध्ये गुंतवणूक” या दीर्घकालीन जपलेले संबंध यावर लक्ष वेधते.
साऊथ इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी. आर. शेषाद्रि म्हणाले, “दिवाळी हा एकत्र येण्याचा, साजरे करण्याचा आणि संबंध दृढ करण्याचा काळ आहे. या फिल्मद्वारे आम्ही हे दाखवू इच्छितो की हे मूल्ये फक्त सणापुरते मर्यादित नाहीत तर आपल्या जीवनात दररोज असतात. एक बँक म्हणून, आम्ही नेहमीच नात्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवला आहे, आणि ही फिल्म आपल्या ग्राहकांना त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यात मदत करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आम्हाला आशा आहे की हा संदेश आमच्या प्रेक्षकांशी जोडले जाईल आणि त्यांना दिवाळीपुरतेच नव्हे तर वर्षभर त्यांच्या प्रिय व्यक्तींशी जवळ येण्यास मदत करेल.”
थॉट ब्लर्ब कम्युनिकेशन्सचे संस्थापक आणि मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर विनोद कुंज म्हणाले, “दिवाळी देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्यात वेगवेगळ्या कथा, विधी आणि परंपरा आहेत. आशा, आनंद आणि नवीन प्रारंभ हा एकसमान धागा आहे जो या विविध कल्पनांना एकत्र बांधतो. हीच दिवाळीची खरी भावना आहे, आणि हेच या जाहिरातीद्वारे सांगण्यात आले आहे.”


या व्हिडिओमध्ये परिवाराची ऊब, एकत्र येण्याचे सुख आणि परंपरेची भावना बँकेच्या नातेसंबंध वाढवण्याच्या वचनबद्धतेसोबत एकत्र गुंफण्यात आलेली आहे. सणासुदीचा काळ जवळ येत असताना, साऊथ इंडियन बँक प्रत्येकाला या स्पर्शून जाणाऱ्या कथेतून दिवाळीच्या खऱ्या भावनेचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करते.