
सांगवी: शितोळेनगर येथील श्रीमती अनिता अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता राहत्या घरापासून निघेल. अंतिमसंस्कार सांगवी स्मशानभूमि येथे होईल.
पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर कै. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या त्या पत्नी होत. उद्योजक अजय नानासाहेब शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ आरती राव, मा. नगरसेवक व स्थायी समितीचे मा. अध्यक्ष अतुल नानासाहेब शितोळे यांच्या त्या मातोश्री होत्या.