पुणे : दिवसेंदिवस पुणे शहराची लोकसंख्या वाढत असून त्याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे, यामुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यातून पुणेकरांची मुक्तता होऊन पुणे सुरक्षित होऊ देत अशी प्रार्थना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी देवीकडे केली.
नवरात्रीच्या निमित्ताने डॉ. गोऱ्हे यांनी श्री तांबडी जोगेश्वरी देवी दर्शन घेऊन देवीची विधिवत पूजा करत देवीला महावस्त्र, गुळाचा नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला.