ओणम सणानिमित्त मल्याळी बांधवांना शुभेच्छा दिल्या

पिंपरी-चिंचवड : मल्याळी समाज हा उच्चशिक्षित, सुसंस्कृत व शांतताप्रिय म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात हा समाज पसरला आहे. दुधात साखर मिसळावी, तसं मल्याळी बांधव जाल तिथं एकजीव होऊन जातो. नोकरी, धंदा, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक मल्याळी परिवार पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन स्थायिक झाले. एवढेच नाही तर तुम्ही पुरते पिंपरी-चिंचवडकर झालात. या शहराच्या विकासात व जडणघडणीत आपणा सर्वांचे महत्वपूर्ण योगदान आहे असे प्रतिपादन, पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे.

ओणम सणानिमित्त किवळे येथील लेखा फार्म येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शंकर जगताप बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केरळ राज्याचे राज्यपाल मा.आरिफ मोहम्मद खान यांच्यासह खासदार श्री.श्रीरंग आप्पा बारणे, सी.ई.ओ.आयआयटीबी श्री.उन्नीकृष्णन नायर सर्व्हिस सो.देहूरोड चे अध्यक्ष श्री.के.मनिकांतन नायर, जनरल सेक्रेटरी श्री.दिलीपकुमार नायर, श्री.बालागंगाधरण, उपाध्यक्ष श्री.हरिकुमार पिल्ले, श्री.पी.एन.के.नायर, श्री.बाळासाहेब तरस, भाजपा उपाध्यक्ष श्री.राकेश नायर, दक्षिण भारतीय आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री.सुरेश नायर आणि मल्याळी समाजातील बांधव उपस्थित होते.

मल्याळी बांधवांना ओणम सणाच्या शुभेच्छा देताना जगताप म्हणाले की, मल्याळी नववर्षाचा शुभारंभ ओणम सणापासून होत असल्याने या सणाला मल्याळी समाजात खूप महत्त्व आहे. मी आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी इथं आलो आहे. मला आपल्या परिवारातील सदस्य म्हणून इथे निमंत्रित केलंत त्याबद्दल सर्वप्रथम आपणास मनापासून धन्यवाद देतो.

बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो, अशी श्रद्धा आहे. बळीराजा प्रजेची खूप काळजी घेणारा, न्यायी, दानशूर व पराक्रमी राजा होता. त्याच्या स्वागतासाठी आपण ओणम सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. अशा या प्रजाहितदक्ष राजाचं राज्य पुन्हा आपल्याला अनुभवला मिळावं, हीच ओणमच्या निमित्तानं परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

माझे अनेक मल्याळी मित्र आहेत. अनेक मल्याळी परिवारांशी माझे अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. हे आपलं प्रेमाचं नातं आपण अधिक दृढ करूयात आणि बळीराजाचं राज्य पुन्हा आणूयात, या सद्भावना पुन्हा व्यक्त करत, शंकर जगताप यांनी उपस्थितांना ओणम सणाच्या शुभेच्छा दिल्या.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »