पुणे शहर काँग्रेस तर्फे माननीय पोलीस सह आयुक्त श्री रंजन शर्मा यांना दिल्लीचे माजी भाजपचे आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिले.

तरविंदर सिंग मारवा याने आमचे नेते राहुल गांधीजी यांचे बाबत अतिरेकी विधान केले होते की जैसे तुम्हारे दादी को मारा वैसे हम तुमको मार देंगे. अशा दहशतवादी वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी एका शब्दानीही विरोध करत नाही.

आपल्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही राहिली आहे का नाही अशी शंका निर्माण झाली आहे कारण असे संभाषण अतिरेकी माणूसच करू शकतो म्हणून आम्ही आज त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा म्हणून हे निवेदन दिले.


यावेळी शहराध्यक्ष माननीय अरविंद शिंदे, माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड,माजी महापौर कमलताई व्यवहारे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष संगीता तिवारी, माजी नगरसेवक अविनाश साळवे, माजी नगरसेवक रफिक शेख, मागासवर्गीय अध्यक्ष सुजित यादव, माजी नगरसेवक मनीष आनंद, मुन्ना खंडेलवाल, हे उपस्थित होते. यावेळी आमचे पुणे शहर अध्यक्ष माननीय अरविंद शिंदे यांनी सहआयुक्त रंजन शर्मा यांच्याबरोबर पुण्यामधील वाढते ड्रग्स चे प्रकार, तसेच या ड्रग्स च्या व्यसनाधीन झालेल्या तरुणाईसाठी एनजीओ आणि पोलीस मिळून त्या मुलांना या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.

याबाबत चर्चा केली. तसेच पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काहीतरी आपण उपाय काढला पाहिजे याबाबतही चर्चा केली. गणेश विसर्जनानंतर वाहतूक कोंडीबाबत एनजीओ सामान्य जनता आणि काही राजकीय लोक यांची बैठक घेऊन काही उपाययोजना करावी असेही चर्चेत ठरले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »