वाल्हेकरवाडीतील पालिकेच्या मुलांच्या शाळेमध्ये रिक्त जागांवर शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिला उपशहर संघटिका ज्योती संदीप भालके यांनी प्रशासकीय अधिकारी संगीता बांगर यांना निवेदन दिले आहे. या वेळी शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर, विभाग प्रमुख संदीप भालके उपशहर प्रमुख हरेश नखाते, उपशहर संघटिका रजनी वाघ, रहाटणी विभाग प्रमुख गोरख पाटील, चिंचवड विभाग प्रमुख किरण दळवी उपस्थित होते.

वाल्हेकरवाडी शाळेमध्ये पहिली ते पाचवीची पटसंख्या ३५० आहे. तर सहावी ते सातवीचा पट १४० आहे. यानुसार शाळेमध्ये 14 शिक्षकांची आवश्यकता आहे. पटसंख्येनुसार शाळेला अजून 4 उपशिक्षक व 3 पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. तसेच मुख्याध्यापिका देखील एक महिन्याने निवृत्त होणार आहे. मुलांच्या सुट्या संपून शाळा चालू झालेली आहेत, तरी अद्याप शिक्षकांची नेमणूक झालेली नाही. शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वाल्हेकरवाडीतील शाळेतील मुलांची गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, – अशी मागणी करण्यात आली आहे व 15 दिवसात जर शिक्षकांची नियुक्ती झाली नाही, तर शाळे समोर ठिय्या आंदोलन करू असा निवेदना द्वारे इशारा दिला आहे. यावेळी हे निवेदन देत असताना शिक्षण प्रशासकीय अधिकारी बांगर मॅडम यांनी शिष्टमंडळाला येत्या आठ दिवसात सर्व शिक्षकांची जागा भरली जाईल असे आश्वासन दिले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »