‘
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादित केले आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी याठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
याठिकाणी उपस्थित राहून भरघोस यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच महिला आणि विद्यार्थ्यांसाठी नृत्य शिबिराचे सादरीकरण करण्यात आले. या नृत्य शिबिरास महिला-भगिनी आणि विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी या नृत्य शिबिराचा समारोप करण्यात आला.
सौ. अश्विनी सागर भागवत यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या आयोजन केले होते. याप्रसंगी माजी महापौर दत्ता धनकवडे, श्री. आप्पा रेणुसे, श्री. युवराज बेलदरे, श्री. सुशांत ढमढेरे, श्री.बाबासाहेब धुमाळ, श्री.संतोष नांगरे, श्री. रामदास गाडे, श्री. निलेश शिंदे आदी उपस्थित होते.