• ढोल ताशाच्या गजरात, जेसीबी तून दोन्ही बाजूला फुलांचा वर्षाव करीत, फटाक्याच्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आला.
  • जुन्नर गावभेट दौऱ्या दरम्यान डिंगोरे घोडेमाळ भेट दिली.
  • गावातील पदाधिकाऱ्यांनी फेटा बांधून औक्षण करून आत्मिय स्वागत केले.
  • गावातुन रँली काढण्यात आली, याला जेष्ठ नागरिक, माता भगिनी तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
  • श्री राम मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

दादा –
मतरूपी आशीर्वाद घेण्यासाठी आज तुमच्यासमोर उभा आहे. मी आज गेल्या वीस वर्षात काय केलं आणि येणारे पाच वर्षात काय करणार हे बोलणार आहे. जुन्नर तालुका पर्यटन साठी सक्षम आहे. शेती कशी करावी हे सर्व महाराष्ट्राला जुन्नर ने सांगितला. विचारवंताचा ऐतिहासिक तालुका आहे. आणि खूप काही नवीन संधी निर्माण करणारा तालुका आहे. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी निधी केंद्रातून मिळत असतो. युनेस्को मधून मदत मिळू शकते. या भागाचा सर्वतोपरी नंदन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे.

अतुल बेनके –
तुम्ही विश्वास दाखवला तरया भागातून अधिकाधिक मताधिक्य मिळेल आपल्या भागातील खासदार कसा असावा हे शिवाजीराव दादाराव पाटील यांनी सिद्ध केला आहे घोडीमाळ कडे जाणारा रस्त्यासाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जनतेच्या कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे.

आशाताई बुचके
वीस वर्षे सलग ज्यांच्याशी आपली नाळ जोडली आहे. त्यांचा उल्लेख माजी म्हणून करता येणार नाही. कारण ते कधीच घरी बसले नाही. गाव आम्हीही दत्तक घेतले. तेथील माता माऊलींचे दुःख त्रास ओळखले. दादांनी त्यांच्यासाठी पाण्याचा टँकरही सुरू केला.

या प्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रियंकाताई शेळके, पुणे जिल्हा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला उज्वलाताई शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला जुन्नर तालुका अध्यक्ष आदिवासी विभाग सीमा जयंत कुमार रघतवान, युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला जुन्नर अक्षदा ताई मांडे/पानसरे, शहराध्यक्ष जुन्नर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी नगरसेविका वैष्णवी ताई चतुर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर कार्याध्यक्ष संगीताताई हांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला जुन्नर सचिव शितलताई गोरे, उपाध्यक्ष जुन्नर वंदनाताई काशीद, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुन्नर तालुका अर्चनाताई पवार, महिला मोर्चा सरचिटणीस जुन्नर तालुका भाजप संजीवनी हांडे, माजी चेअरमन सोसायटी दत्तात्रय लाहोटी, माजी सरपंच संपत लाहोटे, माजी सरपंच विश्वासराव आमले, माजी चेअरमन पांडुरंग मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य बबनराव तांबे, उपसरपंच निलेश लाहोटे, अध्यक्ष यात्रा कमिटी संदीप शिंगोरे, गाडामालक गणेश लाहोटे, माजी सरपंच संदीप मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य अहिलनाना लाहोटे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »