वयाच्या नव्वदाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: सुप्रसिद्ध गायक पंडित जसराज यांनि अमेरिकेतील न्यूजर्सी येथे ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांचा गायकी ची जादू हीच त्यांची शेवटपर्यंत ओळख होती. गायकीने अनेक देश ,विदेशातील चाहत्यांना मंत्रमुग्ध करीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
संगीतातील योगदानाबद्दल त्यांना आत्तापर्यंत पद्मश्री पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ८० हून अधिक वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीताची सेवा केली. त्यांनी भारतासहित विदेशात देखील ठिकाणी संगीताची जादू पसरवत अनेक शिष्य तयार केले.



मेवाती घराण्याची गायकी त्यांनी जगप्रसिद्ध केली होती. गेली सलग . त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार त्याचे अल्बम झाले आहेत. शिवाय त्यातील अनेक प्रकारच्या चीजा चित्रपटांच्या संगीतासाठीही वापरल्या आहेत. हरियाणातील हिस्सारमध्ये २८ जानेवारी १९३० मध्ये त्यांचा जन्म झाला. संगीताची आराधना व सेवा करण्यात संपूर्ण जीवन व्यतीत केले. १९६२ साली त्यांना त्यांची जीवंसंगिनी मधुरा पंडित मिळाली. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या जाण्याची बातमी दिली. सोमवारी कार्डिएक अरेस्टमुळे अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहत होते.