हडपसर :- खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा हडपसर गाठभेटींचा सिलसिला सुरूच आहे. यामध्ये शहरी भागात देखील स्थानिक नागरिकांचा आणि मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

आज सकाळी हडपसर येथे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सय्यदनगर, महंमदवाडी परिसरात गाठभेटींचा दौरा पार पडला दरम्यान अनेक माजी नगरसेवक स्थानिक नेत्यांशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संवाद साधला.

दरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना पुर्वसंध्येला अनेक ठिकाणी भेट देऊन जयंतीच्या तयारीची पाहणी केली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहात स्वागत करत आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागे ठाम असल्याचा विश्वास दिला.

यावेळी विठ्ठल भजनी मंडळ आणि महंमंदवाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहला श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट दिली. यावेळी महादेवजी बाबर साहेब, प्रशांतदादा जगताप, बंडूतात्या गायकवाड, भरतशेठ धर्मवच, संजयजी शेवाळे, हिंगणे ताई, अविनाश गोडबोले, यंसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »