ह. भ. प. किसनमहाराज चौधरी लिखित आणि प्रवीण प्रकाशन निर्मित


‘विश्वप्रार्थना पसायदान’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि लोकार्पण सोहळा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रामा मारुती कुटे सभागृह, रूपेश कॉलनी, दत्तवाडी, आकुर्डी येथे गुरुवार, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाला. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविका ऊर्मिला काळभोर, भाजप पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे, पिंपरी – चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ अध्यक्ष वृषाली मरळ, शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष आबा गायकवाड, सुखलाल बुचडे, सूर्यकांत मुथीयान,


ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, “अतिशय कष्टातून उत्तम कुटे यांनी समाजात आपले स्थान निर्माण केले. तसेच प्रबोधनाच्या माध्यमातून किसनमहाराज चौधरी यांनी नेहमीच संस्कारमूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे!” राजन लाखे यांनी, “विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे केलेले आर्त मागणे म्हणजे पसायदान होय. त्यामुळे ‘विश्वप्रार्थना पसायदान’ या पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे!” असे मत व्यक्त केले. अन्य मान्यवरांनी आपल्या मनोगतांमधून कै. उत्तम मारुती कुटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्रीकांत चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “अखिल विश्वात शांती, समृद्धी, ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नांदावे यासाठी ज्ञानेश्वरमाउलींनी पसायदानरूपी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेचा सुलभ अन् योग्य अर्थबोध ‘विश्वप्रार्थना पसायदान’ या पुस्तकाच्या माध्यमातून होतो!” असे विचार मांडले.

पुस्तक प्रकाशनपूर्वी, किसनमहाराज चौधरी यांनी प्रवचनसेवा रुजू केली. नलिनी सुरगुडे यांनी स्वागतगीत म्हटले. सदाशिव डुंबरे यांनी प्रास्ताविक केले. सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल नारायण भुजबळ, आत्माराम भुवड, जयंतीलाल पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

रूपेश कुटे, गणेश कुटे, मंगेश कुटे, प्रमोद उत्तम कुटे, शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघ आणि कुटे परिवार यांनी संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश कुटे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »