.

पुणे : ‘ग्लॅमर’ आणि ‘निरोगीपणाच्या’ अभूतपूर्व मिश्रणातून संपूर्ण जगाला ग्लॅमवेलची नवी ओळख होत आहे. यामुळे मानवाच्या आरोग्याला परिवर्तकारी दृष्टिकोन मिळाला आहे. याचा लाभ ५५०० पेक्षा अधिक व्यक्ती घेत आहेत. या संदर्भात समाज जागृतीसाठी ३६ हून अधिक वेलनेस अ‍ॅनालिटिक्सचे मोबाइल अ‍ॅप, जगातील पहिल्या ग्लॅमोवेल अनुभव केंद्राचे उद्घाटन, प्रोलक्स वेलनेस, व “वेलनेस रीडिफाइंड“ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच ग्लॅमवेलला ट्रेडमार्कचे पेटंट मिळाले आहे. अशी माहिती ग्लॅमवेल हेल्थ इन्सिटट्यूट डॉ. प्रचिती पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. प्रचिती पुंडे यांनी सांगितले की,“वीकेअर फॉर युवर वेलनेस”, या मोहिमेची सुरुवात लातूर येथून झाली आहे. ग्लॅमोवेल तत्वज्ञान “२:२ ह्यूमन कोकोरो संकल्पनेवर व आधुनिक जीवनाच्या गरजेनुसार प्राचीन ज्ञानाचे मिश्रण करणार्‍या १२ नाविन्यपूर्ण साधनांच्या संचावर आधारित आहे. ही साधने पारंपारिक ध्यान पद्धतींच्या पलीकडे जातात आणि समतोल आणि सुसंवाद साधण्यासाठी सर्वसमावेशक धोरण देतात.
ग्लेमोव्हेलची गरज आजच्या जगात महत्वाची आहे. तांत्रिक प्रगती व सामाजिक दबाव मानवाला आरोग्यापासून दूर घेऊन जात आहे. उत्तम आरोग्याची गरज ओळखून २००८ पासून याचा विकास केला जात आहे. मायक्रोवेव्ह ओव्हन युगात जगतांना आरोग्या संदर्भातील अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यातच  मोबाईल फोन, फास्ट फूड व वेगवान संस्कृतीच्या सतत संपर्कात राहणे नुकसानदायक आहे.
प्रोलक्सची पहिली आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि सांस्कृतिक परिषद २२ फेब्रुवारी रोजी जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, शिवाजी नगर येथे दुपारी १२.१५ ते ५.३० या वेळेत होणार आहे. तितिक्षा इंटरनॅशनल पुणे द्वारा आयोजित या परिषदेत डॉ.आशुतोष मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी भारतरत्न कै. अटलबिहारी वाजपेयी स्मृती गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे.
यावेळी प्रिया दामले यांनी ग्लॅमवेल वेलनेसचा जगभरात विस्तार करण्यासाठी सर्वांनी मदत करण्याचे आवाहन केले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »